सीरियातील युद्धात भूदलाचा (ग्राऊंड ट्रप्स) वापर करण्यात आल्यास जागतिक युद्ध होण्याचा धोका असल्याचा इशारा रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेद्वेदेव यांनी दिला आहे.
जमिनीवरील लष्करी मोहीम आखण्यात आली, तर तीत भाग घेणारा प्रत्येक जण युद्धात ओढला जातो, असे मेद्वेदेव यांनी एका जर्मन वृत्तपत्रात गुरुवारी प्रकाशित झालेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सीरियामध्ये जमिनीवरील सैन्य पाठवावे, असा प्रस्ताव सौदी अरेबियाने अलीकडेच दिला होता. त्याबद्दल विचारले असता रशियन पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला कायमचे युद्ध हवे आहे की नको याबाबत अमेरिकेने तसेच आमच्या अरब भागीदारांनी विचार करायला हवा.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘सीरियात भूदलाचा वापर झाल्यास जागतिक युद्धाचा धोका’
जमिनीवरील लष्करी मोहीम आखण्यात आली, तर तीत भाग घेणारा प्रत्येक जण युद्धात ओढला जातो
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 13-02-2016 at 00:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The risk of global war