संयुक्त राष्ट्राने चीनमधील शीनजियांग प्रांतात मानवी हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या परिसरामध्ये गंभीर स्वरुपाचा छळ झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे. हा प्रकार मानवतेविरोधात गुन्हा असल्याचंही या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. चीनच्या दबावाला न जुमानता या अहवालामार्फत शीनजियांगमधील वास्तव जगापुढे मांडण्यात आलं आहे. जवळपास १० लाख उईगर आणि इतर मुस्लीम अल्पसंख्यांकांना पश्चिम शीनजियांग प्रांतात चीनने ताब्यात घेतल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. या प्रांतातील नागरिकांवर लैंगिक अत्याचार, सक्तीचे वैद्यकीय उपचार करण्यात आल्याचे आरोप विश्वसनीय असल्याचे या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ; सर्वात मोठ्या रुग्णालयात मिळाला नाही प्रवेश, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त मीशेल बॅचलेट यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी जिनिव्हामधील परिषदेत बुधवारी रात्री हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल तयार करण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. बॅचलेट यांचा कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या १३ मिनिटांआधी मानवाधिकार उल्लंघनाचा हा अहवाल परिषदेसमोर ठेवण्यात आला. चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष असलेले बॅचलेट यांच्यावर या अहवालासंदर्भात चीनकडून प्रचंड दबाव होता.

अल-कायदाशी संबंध असल्याचा आरोप असणारा मदरसा पाडला, आसाम सरकारची महिनाभरातील तिसरी कारवाई

“शीनजियांग प्रांतातील समस्या भीषण आहेत. या समस्या राष्ट्रीय स्तरावरील उच्चपदस्थ आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया बॅचलेट यांनी दिली आहे. शीनजियांग प्रांतात मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप चीनने फेटाळला आहे. या प्रांतात कट्टरतावाद्यांना आवर घालण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत असल्याचं चीनने म्हटलं आहे. शीनजियांगमधील उइगर स्वायत्त प्रदेशातील परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन बॅचलेट यांनी संयुक्त राष्ट्राला केलं आहे. दरम्यान, या प्रांतात नरसंहार झाल्याचा कुठलाही उल्लेख या अहवालात नाही. चीनमधील टीकाकारांसह अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी या प्रांतात नरसंहार होत असल्याचा आरोप केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The united nations released a report claiming serious human rights violation in chinas xinjiang region rvs
First published on: 01-09-2022 at 09:59 IST