गेल्या ४० वर्षांत प्रथमच येथील ‘लिटल इंडिया’ भागात झालेल्या भीषण दंगलीप्रकरणी तिसऱ्या भारतीय नागरिकास १८ आठवडय़ांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या दंगलीत सहभागी झाल्याच्या आरोपाखाली २८ भारतीयांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांमध्ये सेल्वराज करीकालन याचाही समावेश होता. या प्रकरणी आपण दोषी असल्याची कबुली सेल्वराज याने दिली होती. सेल्वराजला ८ डिसेंबर रोजी अटक झाली होती. त्याच तारखेपासून त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. सेल्वराज हा एका बांधकाम कंपनीत चालकाचे काम करीत असून आधी त्याच्यावर दंगे माजविण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.याच दंगलीसंदर्भात अन्य दोन भारतीयांनाही १५ आठवडय़ांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याखेरीज अन्य २२ भारतीय नागरिकही दंगलींप्रकरणी खटल्यांना सामोरे गेले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
सिंगापूरमधील दंगलीप्रकरणी तिसऱ्या भारतीय नागरिकास शिक्षा
गेल्या ४० वर्षांत प्रथमच येथील ‘लिटल इंडिया’ भागात झालेल्या भीषण दंगलीप्रकरणी तिसऱ्या भारतीय नागरिकास १८ आठवडय़ांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
First published on: 21-02-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third indian sentenced for role in little india riot in singapore