शितपेय पित असाल तर जरा जपून, कारण तिरूअनंतपूरममध्ये एका नामांकित शितपेयाच्या टेट्रापॅकमध्ये मेलेला साप आढळल्याची घटना समोर आलीय. एका लहान मुलीने अर्धेअधीक शितपेय संपवल्यावर ही बाब प्रकाशामध्ये आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.  
तिरूअनंतपूरममधील साजिव यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये, साजिव यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीसाठी आंब्याच्या गरापासून तयार करण्यात आलेल्या एका नामांकित कंपनीचे शितपेय विकत घेतले. साजिव यांच्या मुलीने अर्धेअधीक शितपेय पिऊन झाल्यावर डब्ब्यामध्ये काहीतरी घट्ट असल्याचे जाणवताच शिल्लक राहिलेले शितपेय ओतून दिले. मुलीने शितपेयाच्या डब्ब्यामध्ये काहीतरी घट्ट असल्याची तक्रार तिच्या आजी जवळ केली. तिच्या आजीने शितपेयाचा डब्बा फोडला असता त्यामध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील छोटा साप आढळल्याचे पोलिस म्हणाले.
त्यांतर मुलीला अस्वस्थ वाटूलागल्यामुळे नजिकच्या रूग्नालयामध्ये हलवण्यात आले. रूग्नालयामध्ये उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
साजिव यांच्या आरोपांनूसार गुन्हादाखल करण्यात आला असून, तपास सुरूकरण्यात आला असल्याचे पेलिसांनी सांगितले.
शितपेयाच्या डब्ब्यावर नमूद केल्याप्रमाणे ते उत्पादन वापर करण्याचा कालावधी टळून गेला असल्याचे समोर आले.
अशाच एका घटनेमध्ये तिरूअनंतपूरममधील आरोग्यविज्ञान महाविद्यालय रूग्नालयामध्ये वाटप करण्यात आलेल्या हवाबंद जेवणामध्ये मेलेला विषारी जातीचा साप आढळला होता.