जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये ३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या या कारवाईला भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, सीमेवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.


माध्यमातील सुत्रांच्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टर (१२० इन्फन्ट्री ब्रिगेड) या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून शनिवारी दुपारच्या सुमारास भारतीय चौक्यांना निशाणा करीत मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले. मात्र, यात दोन जवान तर एक मेजर दर्जाचा अधिकारी शहीद झाला आहे. याप्रकरणी अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.