आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी अहमदाबादमध्ये चक्क जिवंत माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. अहमदाबादमधील रॅलीच्या दरम्यान भाषण करताना केजरीवालांकडून ही मोठी चूक घडली आहे.
केजरीवालांनी आपल्या भाषणात चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली परंतु, पीटीआयच्या दाव्यानुसार यातील तीन कार्यकर्ते आजही जिवंत आहेत.
केजरीवाल यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा, भानू देवानी, मनिष गोस्वामी आणि जयमुख भमभानिया या चौघांना श्रद्धांजली वाहिली होती. पण, यातील फक्त अमित जेठवा यांचा मृत्यू झाला आहे. अन्य तिन कार्यकर्त्ये जिवंत असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्याकडून झालेल्या चूकीवर राजकीय वर्तुळात निषेध नोंदविला जात आहे.
यातील भानू देवानी यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असल्याचे म्हटले त्यानंतर माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली आता, माझी प्रकृत्ती ठिक आहे आणि लवकरच आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याचेही देवानी पुढे म्हणाले. केजरीवालच देशाला भ्रष्टाचारमुक्त करू शकतात असेही देवानी यांनी म्हटले आहे.