scorecardresearch

J& K Terrorists Encounter: ट्रकमधून लपून जात होते दहशतवादी, लष्कराने रोखलं असता गोळीबार; चकमकीत तिघांना केलं ठार

Terrorists Encounter Jammu and Kashmir: भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

J& K Terrorists Encounter: ट्रकमधून लपून जात होते दहशतवादी, लष्कराने रोखलं असता गोळीबार; चकमकीत तिघांना केलं ठार
भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Sidhra Terrorists Encounter Jammu: जम्मू काश्मीरमधील सिधरा येथे सुरक्षा जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. सर्च ऑपरेशनदरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रकमध्ये लपून जात होते. यावेळी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात ते ठार झाले.

“‘ट्रकमध्ये संशयास्पद हालचाल होत असल्याचा संशय आल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला. सिधरा येथे ट्रक थांबवण्यात आला. यावेळी चालकाने पळ काढला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये दहशतवादी लपले होते. त्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात आम्हीही गोळीबार केला,” अशी माहिती मुकेश सिंग यांनी दिली आहे.

चकमक पूर्ण झाली असल्याची माहिती मुकेश सिंग यांनी दिली आहे. दरम्यान अजून काही दहशतवादी लपल्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे.

चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार झाले असून घटनास्थळावरुन त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मंगळवारी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही चकमक झाली आहे. पोलिसांनी १५ किलोंची स्फोटकं निकामी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 09:31 IST

संबंधित बातम्या