१.कोंढवा दुर्घटनेला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणार
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. प्रथमदर्शनी या सगळ्या प्रकारात बिल्डर आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवल्याचं दिसतं आहे. वाचा सविस्तर : 

२.बेभरवशी DLS ला भारतीय पर्याय; ICC ची १७ वर्ष नकारघंटा
इंग्लडमध्ये सुरू असलेला विश्वचषक पाऊस आणि डर्कवर्थलुईस नियमामुळे बराच चर्चेत आला. याच डर्कवर्थलुईसमधील दोष एका भारतीयाने आयसीसीला दाखवून नवा पर्याय शोधून दिला. पण, गेल्या १७ वर्षांपासून आयसीसी त्याला नकार देतेय. डर्कवर्थलुईसवर पर्याय शोधणाऱ्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे, व्ही. जयदेवण.वाचा सविस्तर : 

३.मुंबईतल्या चेंबूर भागात भिंत कोसळली
पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. अशातच मुंबईतल्या चेंबूर भागातही भिंत कोसळली आहे. २ रिक्षांवर भिंत कोसळली आहे. या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. वाचा सविस्तर : 

४.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची पालकांची तयारी
मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले असून ही गुणवत्तेशी तडजोड असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आरक्षणाबाबतच्या निर्णयाला त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे नियोजन वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत.वाचा सविस्तर : 

५.सरकारचा २० हजार कोटींचा गैरव्यवहार
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात बचावात्मक आणि सरकारशी जुळवून घेण्याची भूमिका घेणाऱ्या विरोधकानी अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात मात्र आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. वाचा सविस्तर :