जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे आज (शुक्रवार) पोलीस आणि राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडकर अबू हनझल्ला उर्फ मोहम्मद नावीद याला अटक केली आहे.
अबू हनझल्ला मूळचा पाकिस्तानमधील मुलतान येथील रहिवासी असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमध्ये शोध मोहिम राबविण्यात आली. त्यात अबू हनझल्लाने ज्या ठिकाणी लपून बसला होता तेथून गोळीबार करण्यास सुरूवात केली. सुरक्षा पथकाने प्रत्युत्तरात गोळीबार करतानाच चहूबाजूने घेराव घालून अबू हनझल्ला याला अटक केली.