त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ पैकी ११२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवार उमेवदारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि पडताळणीची तारीख ५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विरोधी पक्ष माकपाचे १५, तृणमूल काँग्रेसचे – ४, काँग्रेस- ८, एफआयएफबी – दोन आणि सात अपक्षय उमेदवारांसह ३६ उमेदवारांनी सोमवारी आपली उमेदवारी मागे घेतली होती. उर्वरीत २२२ जागांसाठी एकूण ७८५ उमेदवार मैदानात आहेत. ज्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यभरात अगरताळा नगरपालिका(५१ वॉर्ड), १३ नगरपरिषदा आणि सहा नगर पंचयातींसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ३३४ जागा आहेत.

सात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अंबासा नगर परिषद, जिरानिया नगर पंचायत, मोहनपुर नगरपरिषद, राणीबाजार नगर परिषद, विशालगड नगरपरिषद, उदयपूर नगरपरिषद आणि संतरिबाजार नगरपरिषदेत कोणताही अपक्ष उमेदवार नाही. माकपाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनी आरोप केला की भाजपाद्वारे आश्रय देण्यात आलेल्या गुंडांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीमुळे त्यांच्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायल भाग पाडलं गेलं.

तसेच, राज्यात हिंसाचार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेच्या बऱ्याच अगोदर सुरू झाली होती. आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ला केला गेला व पाच नगरपरिषदा आणि दोन नगर पंचायतीमध्ये आमचे उमेदवार आपले अर्ज दाखल करू नाही शकले. भाजपाच्या गुंडांना मोठी दहशत पसरवली आहे, असा देखील त्यांनी आरोप केला.