अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा महत्त्वाचा हस्तक मानला जाणारा छोटा शकील याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या हाती या छोटा शकीलच्या संभाषणाची एक सीडी त्यांच्या हाती आली आहे. यामध्ये छोटा शकील फोनवरून मुंबईतील त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधतो आहे. मात्र यानंतर त्याच्या मृत्यूचीही बातमी येते आहे. अंडरवर्ल्डमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार ६ जानेवारीला छोटा शकील इस्लामाबादमध्ये त्याच्या काही कामासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्याला रावळपिंडीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अशी एक माहिती समोर येते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर दुसऱ्या एका माहितीनुसार छोटा शकीलला ISI ने ठार केले आहे. छोटा शकीलसोबत संबंध ठेवणे ISI ला जड जाऊ लागले होते त्यामुळे त्यांनी आपल्या वाटेतून त्याला दूर केले अशीही बातमी आता समोर येते आहे. दोन दिवस त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर ‘सी १३०’ या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने त्याचा मृतदेह कराचीला आणण्यात आला असेही समजते आहे. छोटा शकील त्याची दुसरी बायको आयेशासोबत कराचीतीली डीएचए कॉलनीतील फ्लॅट क्रमांक डी ४८ मध्ये वास्तव्य करत होता. छोटा शकीलचा दफनविधी उरकण्यात आल्यानंतर त्याची दुसरी बायको आयेशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे अशीही माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trusted lieutenant of underworld don dawood ibrahim chhota shakeel may be dead
First published on: 20-12-2017 at 17:43 IST