टर्कीमध्ये पुन्हा एकदा रेसेप तय्यीप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. विरोधी पक्षनेते कमाल कलचदारलू यांचा पराभव करुन एर्दोगन हे ११ व्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात एर्दोगन यांना बहुमत मिळालं. तर कमाल कलचदारलू यांचा पराभव झाला. समोर आलेल्या माहितीनुसार एर्दोगन यांना ५२ टक्के मतं मिळाली आहेत. तर कलचदारलू यांना ४८ टक्के मतं या राऊंडमध्ये मिळाली.

टर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक १४ मे रोजी पार पडली होती. त्यावेळी एकेपी पक्षाचे प्रमुख एर्दोगन हे जिंकता जिंकता राहिले होते. त्या राऊंडमध्ये त्यांना ४९.४ टक्के मतं मिळाली तर कलचदारलू यांना ४५ टक्के मतं मिळाली होती. दोन्ही नेत्यांना त्या राऊंडमध्ये बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे रविवारी दुसऱ्या राऊंडचं मतदान झालं. टर्कीमध्ये मतदानाची ही पद्धत आहे की जर कुणालाच बहुमत मिळालं नाही तर दोन आठवड्यात मतदानाचा दुसरा राऊंड घेतला जातो. २८ मे रोजी ही प्रक्रिया पार पडली त्यामध्ये एर्दोगन विजयी झाले आहेत.

Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
delhi chief minister arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

२०१४पासून तुर्कस्तानचे अध्यक्ष असलेल्या एर्दोगन यांची लोकप्रियता सध्या सर्वात किमान पातळीवर असल्याचे मानलं जात होतं. २०१७मध्ये तुर्कस्तानने सार्वमताद्वारे घटनादुरुस्ती करून संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केला. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत जनतेने एर्दोगन यांना पुन्हा निवडून दिले. मात्र त्यांची लोकप्रियता घसरली. यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे महागाई… व्याज दरवाढ न करण्याच्या एर्दोगन यांच्या धोरणामुळे महागाई २४ वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८५ टक्के चलन फुगवट्यामुळे जनता हैराण आहे. त्यातच ६ फेब्रुवारीच्या प्रलयंकारी भूकंपानंतर परिस्थिती हाताळण्यात यंत्रणांना आलेले अपयश, ही बाबही एर्दोगन यांच्याविरोधात जाईल अशी चर्चा होती. याखेरीज त्यांच्या सरकारमधील मतभेद, जनतेच्या हक्कांची पायमल्ली, न्याययंत्रणेवर आवश्यकतेपेक्षा जास्त नियंत्रण या गोष्टीही विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात जाणाऱ्या ठरू शकतात असं वाटलं होतं. मात्र तसं काहीही घडलेलं नाही. एर्दोगन हेच राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.