बिहारच्या कटीहार जिह्यातील आझमगढ आणि खुरीयार या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रूळालगत आज (सोमवार) सकाळी दोन कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, या ठिकाणाहून रेल्वे पोलिसांकडून अशाच प्रकारच्या आणखी दोन बॉम्ब शोध लावण्यात आला असून ते यशस्वीरित्या निकामी करण्यात आले आहेत. दैनंदिन सुरक्षा तपासणी दरम्यान, रेल्वे रूळालगत पिलर क्रमांक १५६/६७ जवळ ट्रॅकमनला ओळख पटवता न येणा-या दोन दोष्टी निदर्शनास आल्या होत्या, त्या बॉम्ब होत्या अशी माहिती पोलिस अधिक्षक जितेंद्र मिश्रा य़ांनी दिली.
खबरदारी म्हणून आझमगढ आणि खुरीयार या स्थानकांच्या दरम्यान रेल्वेसेवा खंडित करण्यात आली असून रेल्वेरूळांची कसून तपासणी करण्यात येत असल्याचं मिश्रा पुढे म्हणाले.



