Two Chinese nationals Arrested on India-Nepal border : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील जटाही-पिपरौन सीमेवरून बुधवारी संध्याकाळी उशिरा दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे संवेदनशील सीमावर्ती भागात फोटो काढताना आढळून आले होते. मधुबनीचे एसपी युगेंद्र कुमार यांनी पुष्टी केली की, जिल्हा पोलिस आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी)च्या संयुक्त कारवाईत दोघांना भारत-नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे.
“दोघांनाही फॉरेनर्स अॅक्ट १९९४ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अधिकृत प्रवासासाठीचे कागदपत्रे किंवा व्हिसा आढळून आला नाही. प्राथमिक चौकशीमध्ये असे आढळून आले की गेल्या तीन महिन्यांपासून ते नेपाळमध्ये प्रावस करत आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सीमा ओलांडली,” असे अधिकाऱ्याने सांगितले. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
एसपी कुमार पुढे बोलताना म्हणाले की, “आमच्या प्राथमीक तपासादरम्यान, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काही संशयास्पद कंटेट आढळला आहे, ज्याबद्दल आत्ताच सांगितले जाऊ शकत नाही कारण अद्याप चौकशी सुरू आहे. असे असले तरी आम्ही त्यांना अधिकच्या चौकशीसाठी रिमांडवर घेऊ आणि जर गरज पडली तर आम्ही केंद्रीय यंत्राणांची देखील मदत घेऊ.”
फोनमध्ये काय सापडलं?
दरम्यान द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक सुत्रांनी सांगितले की, एका संशयिताच्या फोनमध्ये काही भारत विरोधी व्हिडीओ आढळून आले आहेत. त्यांनी असाही दावा केला आहे की संशयितांबरोबर संवाद साधण्यास अडचण येत आहे, कारण त्यांच्यापैकी एकच जण थोडकी इंग्रजी बोलतो. चौकशीत मदत करण्यासाठी भाषांतर आणि भाषा तज्ज्ञांना बोलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून सध्या या दोघांची ओळख पटवणे, हेतू आणि यांच्या कारवायांची माहिती जाणून घेणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.