दोन मित्रांनी विषारी पदार्थाचं सेवन करत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रसिद्ध तत्त्ववेत्ते ओशो यांचं प्रवचन ऐकलं होतं. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे असं स्टेटस ठेवत या दोघांनी आत्महत्या केली. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले.

कुठे घडली ही घटना?

दोन मित्रांच्या मृत्यूची ही घटना उत्तर प्रदेशातल्या जालौन या ठिकाणी घडली. जालौन हा भाग कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. अमन वर्मा आणि बालेंद्र पाल अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचं प्रवचन ऐकलं होतं. या दोघांनी विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला. बालेंद्रचा मृत्यू जागेवरच झाला. तर अमनची प्रकृती बिघडली ज्यानंतर त्याने त्याच्या घरातल्यांना फोन केला होता आणि विषारी पदार्थ खाल्ल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच अमनच्या घरातल्यांनी अमन आणि बालेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र बालेंद्रचा मृत्यू घरीच झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच अमनवर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या? संशय कायम

पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या चौकशी दरम्यान हे समजलं आहे की अमन आणि बालेंद्र या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. अमन मेडिकल स्टोअर चालवत होता आणि त्याचं लग्नही झालं होतं पण बालेंद्रचं लग्न झालेलं नव्हतं. बालेंद्र अमनला भेटायला येत असे. हे दोघेही ओशोंची प्रवचनं ऐकत असत. ओशोंच्या विचारांचा या दोघांवर खूप प्रभाव होता. मृत्यू हेच सत्य आहे असं स्टेटस दोघांनीही ठेवलं होतं. तसंच जळणारी चिता, प्रेतयात्रा असे एकूण तीन फोटो त्यांनी स्टेटसला ठेवले होते. त्यामुळे या दोघांनी ओशोंचं प्रवचन ऐकूनच आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालेंद्र आणि अमन यांच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

या घटनेनंतर बालेंद्र आणि अमन या दोघांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक असीम चौधरी म्हणाले की दोन मित्रांनी विषारी पदार्थ खाऊन आयुष्य संपवलं. आम्ही या प्रकरणी पुढील तपास करत आहोत. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.