पीटीआय, जम्मू

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले. येथे मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले. शनिवारी संध्याकाळी बालाकोट क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवक्त्याने सांगितले, की शनिवारी संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी बालाकोटमधील सीमेवरील कुंपणावर तैनात असलेल्या लष्कराच्या सतर्क जवानांनी सीमेच्या कुंपणापलीकडे संशयास्पद हालचाल पाहिली व त्यानंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांच्या ताब्यातून दोन एके रायफल व एक शक्तिशाली स्फोटक (आयईडी) जप्त करण्यात आले. मारले गेलेले दहशतवादी व त्यांच्या संघटनेची माहिती अद्याप मिळालेली नाही. राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावावर दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच बालाकोट क्षेत्रात घुसखोर दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना यश आले.