जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवार सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत तीन जवान देखील जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

या ठिकाणी अजुनही चकमक सुरू आहे. शिवाय या भागात आणखी दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता असल्याने परिसरात शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती, दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्याने चकमकीस सुरूवात झाली आहे.