scorecardresearch

अमेरिकेतील ओलीस प्रकरणातील आरोपी ब्रिटिश नागरिक

आरोपीने फेसबुकवर केलेल्या थेट प्रक्षेपणात तो पाकिस्तानी चेताशास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी करताना दिसत आहे

टेक्सास (अमेरिका) : टेक्सास येथील सिनेगॉगमध्ये चार जणांना ओलीस ठेवून पाकिस्तानी वैज्ञानिकाच्या सुटकेची मागणी करणारी व्यक्ती ही ब्रिटिश नागरिक असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. या ४४ वर्षीय आरोपीचे नाव मलिक फैसल अक्रम असून त्याला घटनास्थळी दहा तासांच्या ओलीस नाटय़ानंतर गोळय़ा झाडून ठार करण्यात आले.

एफबीआयच्या स्वात पथकाने ही कारवाई केली. हे ओलीस प्रकरण म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. 

फोर्ट वर्थनजीकच्या काँग्रेगेशन बर्थ इस्रायलमधून शनिवारी रात्री  नऊच्या सुमारास आरोपीच्या ताब्यातून शेवटच्या चौथ्या व्यक्तीची सुटका झाली. त्यानंतर स्वात पथकाच्या गोळीबारात आरोपी ठार झाला. या कृत्यात आणखी कोणी सामील असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत नाही, पण यातून आरोपीचा हेतू स्पष्ट झालेला नाही, असे एफबीआयच्या निवेदनात म्हटले आहे. 

आरोपीने फेसबुकवर केलेल्या थेट प्रक्षेपणात तो पाकिस्तानी चेताशास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी करताना दिसत आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेत्या लष्करी अधिकाऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा या शास्त्रज्ञावर आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uk citizen named us synagogue hostage taker zws

ताज्या बातम्या