इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाचा आज १३ वा दिवस आहे. या १३ दिवसांमध्ये इस्रायल आणि गाझा पट्टीतल्या हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. काही राष्ट्रं इस्रायलच्या समर्थनात उभी आहेत, तर काही देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी (१८ ऑक्टोबर) इस्रायलचा दौरा करून या युद्धात आपण इस्रायलच्या बाजूने उभे आहोत असा संदेश जगाला दिला. तसेच, गाझा पट्टीतली परिस्थिती सुधारावी यासाठी मध्यस्थी केली. त्यापाठोपाठ आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.

इस्रायलमध्ये पोहोचताच ऋषी सुनक म्हणाले, आम्ही इस्रायलबरोबर उभे आहोत. सुनक यांच्यासह जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सुनक यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, मी इस्रायलमध्ये आहे. हे राष्ट्र शोकसागरात बुडालं आहे. मीसुद्धा तुमच्या दुःखात सहभागी आहे. दहशतवादाविरोधात मी तुमच्याबरोबर उभा आहे, यापुढेही मी तुमच्याबरोबर असेन.

Narendra Modi in Kargil Vijay Diwas
Narendra Modi in Kargil Vijay Diwas : “पाकिस्तानने आपल्या इतिहासातून…”; कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा!
Italian journalist fined Rs 4.5 lakh for post mocking PM Giorgia Meloni's height
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीची खिल्ली उडवल्याबद्दल इटलीच्या पत्रकाराला तब्बल ४. ५ लाखांचा दंड!
Appeal petition of Baijuj against bankruptcy oarder
दिवाळखोरीच्या आदेशाविरुद्ध ‘बैजूज’ची अपील याचिका; तात्काळ सुनावणीची मागणी
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
PM Modi Austria visit look back at Indira Gandhi trip to Austria 41 years ago
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या ४१ वर्षे आधी इंदिरा गांधींनी दिली होती ऑस्ट्रियाला भेट; काय होते दौऱ्याचे महत्त्व?
Volodymyr Zelenskyy on Putin and modi meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदी – पुतिन यांच्या भेटीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची नाराजी; म्हणाले…
The israeli supreme court s historic verdict on hardline jews military service is compulsory
विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?
Narendra Modi Ignored Jo Biden On Purpose
मोदींनी हात मिळवायला आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दुर्लक्ष करून घेतली मेलोनी यांची भेट? Video लोकांना आवडला पण खरं काय?

ऋषी सुनक इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना भेटणार आहेत. ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये गाझा पट्टी आणि इस्रायलमधील संपूर्ण परिस्थितीवर चर्चा होईल. इस्रायलच्या भूमीवरून ऋषी सुनक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतील. तसेच या युद्धात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहतील. या युद्धामुळे सामान्य नागरिकाचा मृत्यू होणं ही मोठी हानी आहे, यावर ऋषी सुनक भाष्य करतील, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> पॅलेस्टाईनचे मुस्लिम भारतीय ध्वज घेऊन पळतानाचा Video चर्चेत! कारण ऐकून व्हाल थक्क, काय आहे खरी बाजू

गाझामधल्या रुग्णालयावरील हल्ल्याचा उल्लेख करत ऋषी सुनक म्हणाले, जगातला संघर्ष वाढण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. गाझामधील नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचवण्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. सुनक हे मानवतावाद मदत कॉरिडोर लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी नेतान्याहू यांच्याकडे आग्रह धरतील.