ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने त्यांनी पियर्स मॉर्गन या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच धर्म म्हणजे काय? याबाबतही त्यांनी भाष्य केलं.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाच्या चलनी नोटांवरून राणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवणार, ‘हे’ आहे कारण

नेमकं काय म्हणाले ऋषी सुनक?

“गेल्या निवडणुकीत लिझ ट्रस यांच्याकडून पराभव झाल्यानंतर मी थोडा निराश झालो होतो. या पराभवानंतर माझी राजकीय कारकीर्द संपली, असे मला वाटत होते”, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली. दरम्यान, पुन्हा निवडणूक लढण्याची प्रेरणा कशी मिळाली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, “हिंदूंमध्ये ‘धर्म’ नावाची एक संकल्पना आहे. त्याचा अर्थ ‘कर्तव्य’ असा होतो. कोणतंही काम प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य आहे. लहानपणापासून माझ्यावरही हेच संस्कार झाले आहेत. एकंदरीतच आपल्याकडून अपेक्षित असलेलं काम प्रमाणिकपणे करणं, त्यालाच ‘धर्म’ असे म्हणतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Subway फास्टफूड ब्रँडच्या मालकाने मृत्यूआधी दान केली होती अर्धी संपत्ती; फोर्ब्सने जाहीर केलेला आकडा तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या १०० दिवसांता पंतप्रधान म्हणून अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आमच्यापुढे आणखी बरीच आव्हाने आहेत. मात्र, मला विश्वास आहे, की आम्ही ही आव्हाने पार करू शकतो. जनतेची सेवा करणे हेच आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही देशात बदल घडवून आणू शकतो, अशा मला विश्वास आहे”, असेही ते म्हणाले.