बहुजन समाज पक्षाचे नेते विजय यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या वाढदिवशी (मंगळवार) मुरादाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भाजपा नेत्यांना पळवून पळवून मारू, असा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष भाजपा आहे. काँग्रेसने इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी दिले. भाजपाने नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानींच्या कुशीत बसलेले नरेंद्र मोदी, असे वादग्रस्त वक्तव्य ही त्यांनी केले.

यावरच विजय यादव थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या भाजपावाल्यांना पळवून पळवून मारू. घाबरण्याची गरज नाही. बसपा-सपा एकत्र आल्याने त्यांना त्यांची आजी आठवली असेल. आता तर सुरूवात झाली आहे. पुढे मोठी लढाई आहे. हिंमत हारण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

सपा-बसपाला एका मंचावर पाहून भाजपावाले बेशुद्ध झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विजय यादव हे मुरादाबाद येथील ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून एकदा निवडणूक जिंकून आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up bsp leader vijay yadav give controversial statement said inn bjp waalon ko toh dauda dauda kar maarenge
First published on: 16-01-2019 at 09:58 IST