पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून ३ जुलै २००७ रोजी सातजणांच्या टोळीने राधा कृष्णा आणि स्वामी नाथ या दोघांची खादिवूर मलाही गावी हत्या केली होती. त्यावरून या सातही आरोपींना गुरुवारी येथील न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला. न्यायाधीशांनी या सात आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंडही ठोठावला आहे. राधा कृष्णा आणि स्वामी नाथ या दोघांच्या कुटुंबीयांना दंडाचे ते पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जतिन कुर्मी, चित्रांजन, अशोक पटेल, नंदकिशोर, सैजनाथ, लाल साहिब यादव आणि शिवाजी यादव अशी या खून खटल्यातील आरोपींची नावे आहेत.