पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आता अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या संदर्भातल्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीकडे चुरशीची म्हणून पाहिली जात आहे. निवडणुकींशी संदर्भात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे लक्षात येत आहे की उत्तरप्रदेशात भाजपाचं सरकार येईल. मात्र त्याला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊ तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, समाजवादी पार्टीला आधीच्या तुलनेत यावेळी जास्त फायदा होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा साधारण अडीचपट जास्त जागा यावेळी पक्ष पटकावेल, असं सांगण्यात येत आहे. समाजवादी पार्टी ११९ ते १२५ जागा जिंकेल तर बहुजन समाज पार्टी २८ ते ३२ जागा जिंकू शकेल. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा युतीला एकूण ३२४ जागा मिळाल्या होत्या. या युतीमध्ये सुहेलदेव समाज पार्टीचाही समावेश होता, मात्र तो पक्ष आता भाजपासोबत नाही.

गेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. या युतीने ५४ जागांवर विजय मिळवला होता. तर बहुजन समाज पक्षाचे एकूण १९ जण निवडून आले होते