विवाहाचा प्रस्ताव फेटाळल्याने एकोणीस वर्षांच्या तरुणीने तिच्या २१ वर्षीय मित्राच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. रविवारी रात्री उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ोंडावर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या प्राथमिक माहिती अहवालानुसार आफ्रिन या मुलीने सूरजकुमार याला वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले. तेथुन परतताना  या मुलीने सूरजकुमारवर अ‍ॅसिड फेकले. कुमार हा २० टक्के भाजला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, त्याचा चेहरा काहीसा विद्रूपही झाला आहे. सूरजकुमारने सांगितले, की मी हिंदूू व ती मुस्लीम असल्याने विवाह होऊ शकत नव्हता, माझा विवाह ठरला आहे असे मी तिला सांगितले होते, त्यामुळे तिला राग आलेला होता.

परिक्षेत्र अधिकारी रामानंद कुशवाह यांनी सांगितले, की प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला. पोलिसांनी मुलीवर ३२६ ए कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up girl attacks boyfriend with acid after he declines marriage proposal
First published on: 13-01-2016 at 00:48 IST