शहरातील कोणत्याही पेट्रोल पंपांवरुन तुम्ही वाहनात इंधन भरल्यानंतर निश्चिंत होत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, उत्तर प्रदेशातील काही पेट्रोल पंपांवर बनावट पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तेल माफिया आणि पोलिसांच्या संगनमताने हा प्रकार खुलेआम सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या १० वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, पर्दाफाश करण्यात आलेल्या टोळीकडून थिनर, सॉल्वंट आणि रंग यांचा वापर करुन केवळ प्रतिलिटर ३८ रुपयांत असे बनावट पेट्रोल आणि डिझेल तयार केले जात होते. हे बनावट इंधन तेल माफिया मेरठ शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर आणि दुकांनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देत होते. मोठ्या टँकर्समधून इथे तयार झालेले बनावट पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत होता. धक्कादायक बाब म्हणजे तेल माफियांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांचीही साथ असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up police exposed gang of fake petrol diesel makers aau
First published on: 21-08-2019 at 17:07 IST