अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आणखी २८ चिनी कंपन्यांना अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. बीजिंगच्या “लष्करी-औद्योगिक परिसरा”शी जोडल्या गेलेल्या अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी मर्यादीत चीनी कंपन्यांच्या काळ्या सूचीची यादी गुरुवारी वाढवण्यात आली. व्हाइट हाऊसने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या सैन्य व सुरक्षा उपकरणे पुरविण्यास किंवा पाठिंबा देण्याच्या विचारात घेतलेल्या ३१ चिनी कंपन्यांमधील भांडवल खरेदी करण्यास अमेरिकन लोकांना बंदी घातली होती. दरम्यान  बिडेन यांच्या कारवाईमुळे यात विस्तार झाला. त्यामुळे या यादीत आता ५९ कंपन्यांचा समावेश आहे.

व्हाइट हाऊने दिलेल्या निवेदनानुसार, जर या कंपन्यांना मंजूरी दिली. तर हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन करतात. जे युनायटेड स्टेट्स आणि आमच्या सहयोगी लोकांच्या सुरक्षा किंवा लोकशाही मूल्यांना कमी करते.

आणखी वाचा- व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींचे ईमेल्स लीक; समोर आलं चीन कनेक्शन

ट्रम्प यांच्या नेतृत्वात प्रसिद्ध झालेल्या प्रारंभिक यादीमध्ये चायना मोबाइल, चायना टेलिकॉम, व्हिडिओ पाळत ठेवणारी कंपनी हिकविजन आणि चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यासारख्या प्रमुख टेलीकॉम, बांधकाम आणि तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश होता.

अमेरिकेचा आदेश जाहीर होण्यापूर्वी बीजिंगने गुरुवारी आक्रोश केला. हे “राजकीयदृष्ट्या प्रेरित” असल्याचा दावा त्यांनी केला आहे. चिनी कंपन्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे वचन दिल्या गेले मात्र तथ्ये आणि वास्तविक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बिडेन प्रशासनाने चीनबरोबर आणखी मुत्सद्दी भूमिका घेण्याचे वचन दिले आहे, परंतु संरक्षण आणि तंत्रज्ञानासह अनेक मुद्द्यांवर आपण कठोर भूमिका ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us blacklists 28 chinese companies srk
First published on: 04-06-2021 at 11:17 IST