अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लाम बहुल देशांवर घातलेली बंदी अंशत: लागू करण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी सुरूवातीला ७ देशांच्या मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. पण न्यायालयाने ही बंदी फेटाळली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ६ देशांची नावे प्रतिबंध यादीत समाविष्ट केली होती. यामध्ये सीरिया, लिबिया, इराण, सोमालिया, सुदान आणि येमेनच्या नागिरकांचा समावेश होतो. नव्या सूचीतून ट्रम्प यांनी इराकचे नाव वगळले होते. न्यायालयाने बंदीच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प यांनी यावर टीका करत हा एक अत्यंत वाईट निर्णय असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे म्हटले होते. ट्रम्प प्रशासनाचा हा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.
US Supreme Court allows Trump travel ban to partially take effect: AFP
— ANI (@ANI) June 26, 2017
ट्रम्प यांच्या ६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा आदेश अनेक राज्यातील न्यायालयांनी फेटाळला होता. हवाईतील एका न्यायमुर्तींनी तर ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या काही तास आधीच त्याला स्थगिती दिली होती.