अमेरिकेत जाण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना झटका, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय

करोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत…

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. 24 जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. करोना महामारीमुळे अमेरिकेला मोठा फटका बसला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी लोकांना प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

H-1B व्हिसावर निर्बंध आणल्यामुळे अमेरिकेत जायचं स्वप्न बघणाऱ्या भारतीयांना मात्र मोठा झटका बसलाय. भारतातून मोठ्या संख्येने आयटी प्रोफेशनल H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. याचा फटका अनेक भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांनाही बसेल, ज्या कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या आर्थिक वर्ष 2021 साठी अमेरिकी सरकारकडून H-1B व्हिसा जारी करण्यात आले होते त्यांना याचा फटका बसणार आहे.

करोना संकटामुळे अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसावर निर्बंध आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासह अन्य अनेक श्रेणीतील व्हिसासाठीही निर्बंध आणले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us suspends h1b visa trump says move to help millions of americans sas

ताज्या बातम्या