US-Iran Tensions : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेबाबत बुधवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी हे धोकादायक ठिकाण असल्याचे सांगत येथून काही अमेरिकन सैन्य बाहेर काढले जात असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच ट्रम्प यांनी अमेरिका इराणला अण्वस्त्र मिळवू देणार नाही असेही स्पष्ट केले आहे.
अमेरिकेकडून इराणची राजधानी बगदाद येथे असलेला त्यांचा दुतावास देखील काही प्रमाणात रिकामा केला जात आहे. अमेरिकन दूतावासातील सर्व अनावश्यक कर्मचार्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणार्यांना मध्यपूर्वेतील त्यांचे ठिकाण सोडण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक सुरक्षेला वाढता धोका पाहता या सूचना देण्यात आल्या आहेत, अमेरिकन आणि इराकी सूत्रांनी या घडामोडींबद्दल बुधवारी रॉयटर्स या वृ्त्तसंस्थेला माहिती दिली आहे.
एकीकडे कर्मचाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले जात असताना, दुसरीकडे या रिपोर्ट्समध्ये नेमका कोणत्या प्रकराचा धोका आहे याबद्दल मात्र स्पष्टता देण्यात आली नाही. मात्र याचा परिणाम बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती या ४ टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढल्या.
बगदाद येथील दुतावासातील काही कर्मचार्यांना देशातून बाहेर पडण्यात सांगण्यात आल्याबद्दल विचारले असता, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली म्हणाल्या , “स्टेट डिपार्टमेंटकडून परदेशात असलेल्या कर्मचार्यांचा सातत्याने आढावा घेतला जातो आणि नुकतेच घेतलेल्या आढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” रॉयटर्सने यासंबंधीचे वृ्त्त दिले आहे.
“ते धोकाधायक ठिकाण ठरू शकते म्हणून त्यांना बाहेर काढले जात आहे कारण, आणि आपण काय होतं ते पाहूयात, आम्ही बाहेर पडण्यासाठी सूचना दिल्या आहेत,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले. मध्यपूर्वेतील सुरक्षेला असलेला धोका कमी करण्यासाठी काही करता येईल का याबद्दल विचारले असता ट्रम्प इराणचा संदर्भ देत म्हणाले की, “त्यांच्याकडे अण्वस्त्र असू शकत नाही. हे अगदी सोपं आहे, त्यांच्याकडे अण्वस्त्र असू शकत नाहीत.” अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने बुधवारी प्रवासासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील बदल केला आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने बुधवारी या मार्गदर्शक सूचनांमध्ये केलेल्या बदलांची माहिती देताना सांगितले की, “११ जून रोजी, भागात वाढलेल्या तणावामुळे स्टेट डिपार्टमेंटने नॉन-एमर्जन्सी अमेरिकन सरकारी कर्मचार्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
या परिस्थितीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांना माहिती असल्याचे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच इराक बरोबरच स्टेट डिपार्टमेंटने बहरिन आणि कुवेत येथून देखील बाहेर पडण्यास परवानगी दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.