अमेरिकेतील टेक्सासमध्ये ९ वर्षाच्या चिमुरडीला शाळेत पॉर्न बघताना पकडल्याची घटना समोर आली आहे. ती पॉर्न का बघत होती याचे उत्तर त्या चिमुरडीने दिले असून तिचे उत्तर ऐकून शिक्षकांनाही धक्का बसला. पित्याने त्या चिमुरडीवर अत्याचार केले होते आणि त्यांनी रात्री नेमके काय केले हे जाणून घेण्यासाठी ती पॉर्न बघत होती. मन सुन्न करणाऱ्या या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून पीडितेच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक्सासमधील एका शाळेत शिकणारी नऊ वर्षाची चिमुरडी आयपॅडवर पॉर्न बघत होती. हा प्रकार शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीला जाब विचारला. पण त्या चिमुरडीचे उत्तर ऐकून शिक्षकही हादरून गेले होते. “माझे बाबा मला रात्री झोपू देत नाही, ते मला त्रास देतात’ असे तिने सांगितले. सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलीवर तिचे वडील लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरु होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usa 9 year old girl watches porn at school in texas to to find out what dad did to her at night father arrested
First published on: 30-05-2017 at 18:01 IST