उत्तर प्रदेशात महिला पोलीससुद्धा सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मेरठमध्ये एका महिला शिपायासोबत बलात्काराची दुर्दैवी घटना घडली आहे. या महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्यानंतर पतीने तिला ट्रिपल तलाक दिला आहे. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित महिला शिपयाचा सासरा आणि पती दोघंही पोलिसात आहेत. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार देत न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती, सासरा आणि सासूसह ७ जणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेरठमधील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला शिपायाचा २०१८ मध्ये पोलीस शिपाई आबिदसोबत निकाह झाला होता.मात्र निकाह झाल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळीनी तिच्याकडे हुंड्याची मागणी केली. तसेच पैसे आणण्यासाठी तगादा लावला. मात्र महिला शिपायाने या मागणीला विरोध केला. त्यामुळे तिचा पती तिला मारहाण करत होता. तसेच तिचा सासरा आणि दीर तिच्यावर वाईट नजर ठेवून होते. काही दिवसांपूर्वी तिच्या दीराने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे कपडेही फाडले होते. मात्र त्यानंतर बुधवारी तिच्या सासऱ्याने संधी साधत तिच्यावर अत्याचार केला.

Video: अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोत हॉट एअर बलून हवेतच फुटल्याने ५ जणांचा मृत्यू

महिला शिपाई रात्री घरी एकटी होती. ती एकटी असल्याची संधी साधून सासरा नजीर अहमदने तिला पकडलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेची कुठेही वाच्यता केली, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेची माहिती तिने आपल्या पतीला दिली. हे ऐकल्यानंतर पतीने तिलाच मारहाण केली आणि ट्रिपल तलाक दिला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. यानंतर पीडित महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh female constable raped by father in law tripple talaq by husband rmt
First published on: 27-06-2021 at 17:30 IST