उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बांधकाम सुरू असलेल्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी २४ मीटर पट्टय़ातील ढिगारा हटवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे (एनएचआयडीसीएल) देण्यात आली. या बोगद्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून ४० मजूर अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध संस्थांचे १६५ कर्मचारी कार्यरत आहेत.

शक्तिशाली यंत्रांच्या मदतीने २४ मीटपर्यंत ढिगारा हटवण्यात आला आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी एकूण ६० मीटपर्यंत ढिगारा हटवणे आवश्यक आहे. त्यासाठी ८०० आणि ९०० मिलीमीटर व्यासाचे पाइप एकापाठोपाठ एक टाकले जात आहेत. एका तासाला चार ते पाच मीटर खोदकाम होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या पथकाला हा अपेक्षित वेग गाठता आलेला नाही. त्याबद्दल माहिती देताना ‘एनएचआयडीसीएल’चे संचालक अंशु मनीष खलखो यांनी सांगितले की, हे पाइप यंत्रावर इष्ट पद्धतीने चढवणे आणि त्यानंतर पुढे ढकलण्यापूर्वी वेल्डिंग करणे यासाठी वेळ लागत आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा >>> स्थानिकांना खासगी क्षेत्रात आरक्षण घटनाबाह्य़! पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्वाळा; खट्टर सरकारने केलेला कायदा रद्द

त्याबरोबरच ड्रिलिंगचे यंत्र डिझेलवर चालवले जात आहे त्यामुळेही प्रगतीचा वेग मंद आहे. काम करताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असल्याचेही खलखो म्हणाले. सध्या वापरले जात असलेले यंत्र हवाई दलाच्या विमानांनी दिल्लीहून आणले आहे. त्याच्या जोडीला इंदूरहून आणखी एक ‘ऑगर’ यंत्र मागवण्यात आले आहे. जेणेकरून बचावकार्यात कोणताही खंड पडणार नाही.

नातेवाईकांना बोलण्याची संधी

अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना पाइपमधून त्यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून आलेल्या दोघांनी त्यांच्या नातेवाईक मजुरांशी संवाद साधला. माझा पुतण्या आत अडकला आहे, मी त्याच्याशी बोललो. तो म्हणाला की तो ठीक आहे अशी माहिती शत्रुघ्न लाल यांनी दिली. लखिमपूर खिरी येथून आलेल्या एका मजुराच्या वडिलांनीही आपल्या मुलाचा आवाज ऐकता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.