पीटीआय, बंगळूरु

कन्नड चित्रपटसृष्टीच्या पहिल्या महिला सुपरस्टार आणि तमिळ चित्रपटसृष्टीच्या ‘अभिनय सरस्वती’ अशी मानाची बिरुदे मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजादेवी यांचे सोमवारी निधन झाले अशी माहिती चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी दिली. त्या ८७ वर्षांच्या होत्या. बंगळूरुमधील मल्लेश्वरम येथील राहत्या घरी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बी सरोजादेवी यांना तमिळमध्ये प्रेमाने ‘कन्नडातु पैंगिली’ (कन्नड पोपट) म्हणून संबोधले जाई. त्यांनी १९५५मध्ये वयाच्या १७व्या वर्षी ‘महाकवी कालिदास’ या कन्नड चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

तमिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांच्याबरोबर त्यांनी १९५८मध्ये ‘नदोदी मन्नन’ हा तमिळ चित्रपट केला. त्यानंतर त्यांची गणना आघाडीच्या तमिळ अभिनेत्रींमध्ये होऊ लागली.

दिलीपकुमार, वैजयंतीमाला यांच्याबरोबरचा ‘पैगाम’ (१९५९), राजेंद्रकुमारबरोबर ‘ससुराल’ (१९६१), सुनील दत्त यांचा ‘बेटी बेटे’ (१९६४) आणि शम्मी कपूरबरोबर ‘प्यार किया तो डरना क्या’ (१९६३) या हिंदी चित्रपटांमध्ये बी सरोजादेवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

१९६९

पद्माश्री

१९९२

पद्माभूषण

२००८

जीवनगौरव पुरस्कार

२००९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तमिळनाडू सरकारचा कलैममाणी जीवनगौरव पुरस्कार