scorecardresearch

Premium

“महात्मा गांधी महापुरुष, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, उपराष्ट्रपतींच्या विधानाने देशभर खळबळ; काँग्रेसकडून टीका

Jagdip Dhankar Speech on Narendra Modi : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे.

Jagdeep Dhankar
उपराष्ट्रपती जगदीप धनखड काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महापुरुष आणि योगपुरूष अशी तुलना केली आहे. सोमवारी जैन तत्वज्ञानी श्रीमद राजचंद्र यांना समर्पित कार्यक्रमात जगदीप धनखड बोलत होते.

ते म्हणाले की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेने आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले आहे.” ते पुढे म्हणाले की, या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. या दोघांच्या आचरणात श्रीमद राजचंद्र यांची शिकवण आहे.

Hearing on Sharad Pawar petition today
शरद पवारांच्या याचिकेवर आज सुनावणी
will take action against Rahul Gandhi says Hansraj Ahir
“राहुल गांधींवर कारवाई करणार,” हंसराज अहीर यांची माहिती; म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी ओबीसी…”
solapur ajit pawar marathi news, ajit pawar latest marathi news, ajit pawar supriya sule latest marathi news,
“सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उत्तरासाठी आपण बांधील नाही”, अजित पवारांचे भाष्य
uddhav thackeray narendra modi (3)
“…तर तुम्हाला नितीश कुमार कशाला हवेत? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना प्रश्न; हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरूनही टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करताना त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की, “या देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती, या देशाचा उदय पचवू न शकणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत.”

उपराष्ट्रपतींच्या विधानावर काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी टीका केली. महात्मा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेल्या तुलनेला त्यांनी लज्जास्पद म्हटलं आहे. X वरील एका पोस्टमध्ये मणिकम टागोर यांनी लिहिले की, “तुम्ही महात्मा गांधीशी तुलना केली हे लाजिरवाणे आहे. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर अशी विधाने तुम्हाला शोभत नाहीत.”

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे दिल्लीत अनावरण केले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vice president compares pm modi to mahatma gandhi congress says shameful sgk

First published on: 27-11-2023 at 23:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×