भाजपा कार्यकर्त्यांना दारु वाटप केले जात असल्याचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्याने ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओला अवघ्या दोन तासांमध्ये तीन हजरांहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाच्या प्रचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या BJP असं अक्षरं लिहिलेल्या भगव्या गांधी टोप्या डोक्यावर घालून गळ्यामध्ये भाजपाचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या कमळाच्या निशाणासहीतचे स्कार्फसारखं कापड गुंडाळून एक व्यक्ती दारुचे वाटप करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या आजूबाजूला त्याच्याप्रमाणेच डोक्यावर आणि गळ्यामध्ये भाजपाच्या प्रचारात वापरल्या जाणाऱ्या टोप्या आणि गळ्यातील स्कार्फ बांधलेले लोक हातात प्लास्टिकचे ग्लास धरुन आपल्याला दारु कधी मिळते याची वाट पाहत आहेत. या व्हिडीओमधील कॅमेरा ही दृष्य दाखवून झाल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या एका छोट्या मंडपामध्ये वळतो. तिथे सुद्धा अशाच प्रकारे दारुची बाटली घेऊन उभ्या असणाऱ्या कथिक कार्यकर्त्यांभोवती इतर लोक ग्लास घेऊन दारु मिळवण्यासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये शेकडो लोक दारु मिळवण्यासाठी या छोट्या मंडपामध्ये आणि मंडपाबाहेरही दारु वाटप करणाऱ्यांभोवती गर्दी करुन उभे असल्याचं दिसत आहे.

श्रीनिवास बी व्ही यांनी हा व्हिडीओ शेअर करताना भाजपाच्या प्रचारासाठी वापरलं जाणारं, ‘सब का साथ… सब का विकास’ हे वाक्य वापरलं असून पुढे त्यांनी, ‘सभी को शराब’ असंही लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हेरिफाइड अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आला असला तरी तो कुठे आणि कधी शूट करण्यात आलाय याबद्दलची माहिती श्रीनिवास यांनी दिलेली नाही. मात्र दोन तासांमध्ये एक लाखांहून अधिक व्ह्यूज या ३८ सेकंदाच्या व्हिडीओ मिळालेत.