व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागांत असलेल्या लष्करी संकुलातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २१ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
झेड-१२१ लष्करी संकुलात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने कारखान्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. अनेक तास फटाक्यांचे स्फोट झाले. त्यामध्ये बहुसंख्य जण गंभीर भाजले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्फोटामुळे सदर परिसरात राहणाऱ्या जवळपास दोन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. मात्र आता आग नियंत्रणात आणण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोट कशामुळे झाला त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2013 रोजी प्रकाशित
फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात २१ ठार
व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागांत असलेल्या लष्करी संकुलातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात २१ जण ठार झाले

First published on: 13-10-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vietnam firework factory explosion kills