प्रसारमाध्यमांना उद्देशून ‘प्रेस्टिटय़ूट’ अशा शब्द वापरल्याबद्दल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे. पण १० टक्के पत्रकारांना आपले शब्द लागू पडतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यापेक्षा पाकिस्तानी वकिलातीला भेट देणे जास्त सनसनाटी आहे असे सिंग यांनी उपरोधाने म्हटले होते. त्याचा विपर्यास करून वार्ताकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांना उद्देशून सिंग यांनी ‘प्रेस्टिटय़ूट’ असा शब्द वापरला होता. त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vk singh apologises to media for presstitutes remark
First published on: 12-04-2015 at 05:13 IST