जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर रशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती व्लादिमीर पोटॅनिन हे जगातील सर्वात मोठ्या घटस्फोटाच्या दाव्याला सामोरे जात आहेत. पोटॅनिन यांची पूर्व पत्नी, नतालिया पोटॅनिया, MMC Norilsk Nickel PJSC मधील त्याच्या स्टेकच्या एकूण मूल्याच्या ५०% रक्कम मागत आहे,. मंगळवारी लंडन न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. घटस्फोटाच्या दाव्याची ही रक्कम ७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते, असं म्हटलं जातंय.

पोटॅनिनाने पोटॅनिन यांच्यावर ‘डिवॉर्स टुरीझम’ केल्याचा आरोप केल्यानंतर पोटॅनिन खटला लढवत आहे. यूके सर्वोच्च न्यायालय आपल्या अपीलवर विचार करेल की नाही, याबद्दल पोटॅनिन वाटत बघत आहेत, असं न्यायाधीश निकोलस फ्रान्सिस म्हणाले.

पोटॅनिना म्हणाली, की नोरिल्स्क स्टॉक व्यतिरिक्त २०१४ पासून शेअर्सवरील सर्व लाभांशांपैकी ५०% स्वीकारण्यास तयार आहे. तिच्या माजी पतीने तेव्हापासून सुमारे ४८७.३ अब्ज रूबल ($६.६ अब्ज) लाभांश जमा केले आहेत. आणि ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार त्याची एकूण संपत्ती $२९.९ अब्ज डॉलर आहे. ऑटम हाऊस म्हणून ओळखल्या जाणार्‍या महागड्या रशियन मालमत्तेची निम्मी किंमत मिळवण्यासाठी पोटॅनिनाचे प्रयत्न सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लंडनमधील घटस्फोट न्यायालये हायप्रोफाईल आणि मोठ्या रकमेच्या घटस्फोटाच्या दाव्यांच्या रकमेसाठी कायदेशीर लढ्यासाठी प्रसिद्ध आहेत.