ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेतेपद आणि देशाचे पंतप्रधानपद यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आज या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडला. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि परराष्ट्र सचिव लिज ट्रस यांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद झालं आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे त्यांच्या हुजूर पक्षावर त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आली. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून सुरु असणारी मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली असून ब्रिटनच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार हे ५ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

एका अंदाजानुसार हुजूर पक्षाचे १ लाख ८० हजार ते २ लाख सदस्य पक्षाचा पुढील नेता कोण असतो हे निश्चित करतात. पक्षाचा नेताच पंतप्रधान पदावर विराजमान होतो. पक्षाचा नेते निवडणाऱ्या या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्के इतकी आहे. देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा दिला तर सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि सदस्यांना पुढील नेता निवडण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. बोरिस जॉन्सन यांनी जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी अंतिम चुरस रंगली आहे.

prakash javadekar kerala lok sabha marathi news
केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
BJP invited global parties
“भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’
complaints on C-Vigil App
‘सी-व्हिजिल ॲप’वर तक्रारींचा पाऊस! राजकीय पक्षाच्या होर्डिंग, बॅनरविरोधात सर्वाधिक तक्रारी

क्विन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील ‘द मायली अॅण्ड इन्स्टीट्यूट’ने दिलेल्या आकडेवारीनुसार १ लाख ८० हजार ते २ लाख सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करतात. यामधील ४४ टक्के मतदार हे ६५ हून अधिक वयोगटातील आहेत. तर ९७ टक्के मतदार हे गोरे आहेत असा उल्लेख या अहवालात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी सत्ताधारी  हुजूर (काँझव्‍‌र्हेटिव्ह) पक्षाच्या इच्छुक ११ उमेदवारांमधून काही निवडफेऱ्यांनंतर संसदीय हुजूर पक्षाच्या सदस्यांनी सुनक आणि ट्रस या दोघांचीही पक्षाचे नेतृत्वपद व पंतप्रधानपदासाठीच्या स्पर्धेतील अंतिम टप्प्यासाठी मतदानाद्वारे निवड केली. 

माजी चॅन्सेलर आणि माजी अर्थमंत्री असलेल्या ऋषी सुनक यांची करोना काळातील धोरणं ही त्यांची सकारात्मक बाजू आहे. आता, ब्रिटनमध्ये राहणीमानाचा खर्च आणि ऊर्जा संकट तोंड वासून उभे असताना सुनक यांचा प्रामाणिक आणि सरळ दृष्टिकोन आणि भक्कम आर्थिक पार्श्वभूमी देशाला आवश्यक आहे, असे काहींचे मत आहे. मात्र ब्रिटनमधील जनमत चाचण्या घेणाऱ्या वेबसाइट्स आणि सट्टा लावणाऱ्या वेबसाईट्सच्या दाव्यांनुसार ऋषी सुनक हे पंतप्रधान बनण्याची शक्यता ही कमी आहे.

सुनक यांना चौथ्या फेरीत त्यांच्या पक्षातून ११८ मते मिळाली. पाचव्या फेरीतही सुनक यांची लोकप्रियता पाहायला मिळाली. त्यांना २० जुलैला झालेल्या या फेरीत १३७ मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी लिज ट्रस यांना ११३ मतं मिळाली होती. मात्र नंतर जुलैच्या मध्यात झालेल्या मतदानामध्ये ट्रस यांनी सुनक यांच्यावर २८ मतांनी आघाडी मिळवली होती. नंतरही सुनक मागे पडत असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर आल्या. त्यामुळे आता अंतिम निकाल काय लागणार याबद्दल उत्सुकता कायम आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म

ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. मात्र, त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये झाला होता, तर आई उषा यांचा जन्म तंजानियामध्ये झाला होता. ऋषी यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटिशकालीन पंजाबमध्ये झाला होता. १९६० मध्ये ते आपल्या मुलासोबत ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. १२ मे १९८० रोजी ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये झाला. तीन भाऊ बहिणींमध्ये ऋषी सगळ्यात मोठे आहेत.

ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द

भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साऊथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षणही घेतले. आपल्या शैक्षणिक काळात ते हुशार विद्यार्थी होते. ऋषी सुनक यांनी पदवीनंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्म्समध्ये भागीदार बनले. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य करते.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करतानाच ऋषी सुनक यांची भेट इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. पुढे अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांनी लग्न केले. अक्षता मूर्ती ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुली आहेत.

ऋषी सुनक यांचा राजकीय प्रवास

ऋषी सुनक २०१५ मध्ये यॉर्कशर येथील रिचमंड मतदारसंघात निवडून येत पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षात त्यांचे महत्व वाढत गेले. ऋषी यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्याकडे हुजूर पक्षाचे उगवते नेतृत्व म्हणून पाहिले जाते. पक्षातील अनेक बडे नेते त्यांचे वारंवार कौतुक करताना पाहायला मिळाले आहे. ऋषी सुनक यांना क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यांना डिश ऋषी या टोपण नावानेही संबोधले जाते.