पावसाळा सुरू असल्यानं ढगफुटी झाल्याचे आणि पुराचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. असाच मध्य प्रदेशच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. सिधी जिल्ह्यातील देवरी डॅममधून पाणी चक्क आकाशात परत जाताना दिसतंय. आभाळ भरून आलंय आणि तेवढ्यातच पाण्याचा मोठा प्रवाह धरणातून वरती जाताना या व्हिडिओत दिसतोय. वादळ आल्यानंतर ज्याप्रमाणे जमिनीवर एखाद्या ठिकाणी मातीचे कण एकत्र येतात, अगदी त्याप्रमाणे धरणातील पाणी एकत्र येऊन परत ढगात जाताना दिसंतय.

या घटनेचे काही व्हिडिओ तिथल्या स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सायंकाळी वाजताच्या सुमारास वादळानंतर पाण्याचा फवारा तयार झाला आणि आधी वर जात असलेलं पाणी पुन्हा धरणात येईपर्यंत जवळपास १५ मिनिटे टिकला. काही नेटकऱ्यांनी याला पाण्याचं चक्रीवादळही म्हटलंय. तुम्ही धरणातील पाणी ढगात जाताना पाहिलंय का, नसेल पाहिला तर हा व्हिडिओ पहा.

पाण्याचा एवढा मोठा फवारा तयार होणं ही घटना दुर्मिळ आहे. ढग दाटून आल्यानंतर आणि जोरदार वाऱ्यांमुळे पाण्याचा असा फवारा तयार होतो, असं म्हटलं जातं.