पश्चिम बंगाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱया बारावीच्या परीक्षेचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत, ही माहिती मंडळातील अधिकाऱ्यांकडून नुकतीच देण्यात आली.

१२ वीच्या परीक्षेचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्याला काहीसा उशीर होत असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश घेताना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोर्डाने सांगितले. त्यामुळे या निकालाला आणखी उशीर होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मंडळाने सांगितले.

मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेला ११.४ लाख विद्यार्थी बसले होते. हे निकाल विद्यार्थ्यांना wbresults.nic.in या वेबसाईटवर पाहता येतील, असेही मंडळाकडून कळविण्यात आले आहे.