जम्मू-काश्मीरच्या उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) नजीक असणाऱ्या लष्करी तळाची सुरक्षा करण्यात आलेल्या अपयशाबद्दल विचार झाला पाहिजे. जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्यात पाकिस्ताननेही निश्चितच मदत केली होती. एअर इंडियाचे विमान हायजॅक झाले त्यावेळी मसूद अझरला सोडून आपण तडजोड केली का? हा आपल्यासाठी धडा आहे का? राष्ट्रीय सुरक्षेशी कधीही तडजोड करता कामा नये, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
जैश : ‘आयएसआय’चे छुपे सैन्य
जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावरील हल्ल्यामुळे दुखावलेल्या लष्करी मोहिमा महासंचालकांनी (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स- डीजीएमओ) त्यांच्या पाकिस्तानी समपदस्थांना दूरध्वनी करून, हा हल्ला करणाऱ्या ‘विदेशी’ दहशतवाद्यांनी वापरलेल्या उपकरणांवर पाकिस्तानी चिन्हे असल्याबाबत ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली होती. लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी १० डोग्रा रेजिमेंटच्या प्रशासकीय तळावर झालेल्या या हल्ल्याचे वर्णन ‘फार मोठा धक्का’ असे केले. सकाळी साडेपाचला सुरू होऊन साडेआठपर्यंत संपलेल्या या हल्ल्यात चार दहशतवाद्यांचा सफाया करण्यात आला, तर २० जवान शहीद झाले आहेत. ठार मारण्यात आलेल्या चारही जण विदेशी दहशतवादी होते आणि त्यांनी बाळगलेल्या वस्तूंवर पाकिस्तानी चिन्हे (मार्किंग्ज) होती. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद तंझीम या संघटनेचे होते असे संकेत सुरुवातीच्या माहितीवरून मिळत असल्याचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी साऊथ ब्लॉकमध्ये पत्रकारांसमोर केलेल्या निवेदनात सांगितले.
कंदहार विमान अपहरणावेळी दहशतवाद्यांवर अचानक हल्ला करण्याची योजना होती…
डिसेंबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या आयसी- ८१४ विमानाचे अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले आणि अपहृत प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात मसूद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या तीन कट्टर अतिरेक्यांना सोडण्यात आले होते. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात हीच संघटना आणि तिचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा हात होता. कंदहार सुटकेनंतर लगेचच मसूदने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली होती. सध्या या संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहवालपूर येथे आहे.

[jwplayer EztVJWax]