रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर आता डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष बनणार आहेत. तर, त्यांच्याच पक्षाच्या कमला हॅरिस यांनी देखील उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूकीत यश मिळाल्यानंतर कमला हॅरिस यांनी ही माहिती जो बायडन यांना फोन करून दिली. त्याप्रसंगी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. या क्षणाची एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ”We did it Joe! तुम्ही अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार आहात” असं जो बायडन यांना म्हटलं आहे.

कमला हॅरिस आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार असून, या पदापर्यंत पोहचणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत. तर, भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष होत आहेत.  बायडेन आणि हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार आहे.

 

निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना कमला हॅरिस यांनी त्यांच्या आईची देखील आठवण काढली. त्यांनी म्हटले की, ”माझी आई श्यामला गोपालन जेव्हा १९ वर्षांची होती, तेव्हा ती भारतातून इथे आली होती. तेव्हा कदाचित तिने देखील या क्षणाची कल्पनाही केली नसावी. मात्र ती अमेरिकेवर एवढा विश्वास करत होती की, जिथे असा क्षण शक्य आहे.”

ही निवडणूक जो बायडेन या व्यक्तीपुरती नव्हती, तर ती अमेरिकेच्या मूलतत्वांच्या रक्षणाची होती. त्यासाठी लढण्याची इच्छा दाखवण्याबाबतची होती. पुढील काम कठीण असले तरी आम्ही ते करू. असा विश्वास देखील कमला हॅरिस यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We did it joe kamala harris msr
First published on: 08-11-2020 at 09:42 IST