.. तर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पुन्हा एलओसी पार करू, भारताचा पाकला इशारा

दहशतवाद्यांना मारण्यासाठी आम्ही पुन्हा एलओसी पार करू असा इशारा दिला आहे.

india loc
जर पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे सुरूच ठेवले तर भारत पुन्हा एकदा नियंत्रण रेषा पार करून हल्ले करू शकतो असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने इंडिया टाइम्सने वृत्त दिले आहे.

जर पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे सुरूच ठेवले तर भारत पुन्हा एकदा नियंत्रण रेषा पार करून हल्ले करू शकतो असे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने इंडिया टाइम्सने वृत्त दिले आहे. १९९९ मधील परिस्थितीपेक्षा भारत आता वेगळ्या स्थितीत असल्याचेही त्यात म्हटले आहे. जेव्हा पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली. तेव्हा भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पुन्हा दोन्ही देशांच्या सीमांवर रक्तरंजित घटना टाळण्याचा सल्ला दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रोत्साहन देण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आता भारताने पाकिस्तानला इशारा दिला असून दहशतवाद्यांना मारण्यासाठी आम्ही पुन्हा एलओसी पार करू असा इशारा दिला आहे.
सहा जानेवारी २००६ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन होणार नसल्याचा शब्द दला होता. उरी हल्ल्यानंतर भारताकडून अशा प्रतिक्रियेची पाकिस्तानला अपेक्षा नव्हती. भारताने हल्ला करण्यासाठी वेगवेगळे तळ निवडले होते.
गत आठवड्यात शुक्रवारी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नासीर जंलुआ यांनी त्यांचे भारतीय समकक्ष अजित डोवालांशी चर्चा करताना तणाव कमी करण्यावर भर दिला होता. येत्या काही दिवसांत पाकिस्तान प्रति हल्ला करू शकती अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ हे नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होतात की पदावर टिकून राहतात याकडेही भारताचे लक्ष लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: We will be crossing loc to hunt down terrorists india conveys to pakistan

ताज्या बातम्या