Delta Airline Memo For Flight Attendants : विमान प्रवासात प्रवाशांच्या दिमतीला असलेल्या फ्लाईट अटेंडंटना त्यांच्या संबंधित कंपनीकडून अनेक बंधने लादली जातात. या व्यावसायिक बंधनांचं पालन करून फ्लाईट अटेंडंटना काम करावं लागतं. त्यांनी कसं दिसावं, कसं राहावं, कसं बोलावं, याचं प्रशिक्षण दिलं जातं. आता डेल्टा एअरलाईने यासंदर्भातल एक मेमोच काढला आहे. संभाव्य फ्लाईट अटेंडंट आणि सध्या कार्यरत असलेल्या फ्लाईट अटेंडंटसाठी हा मेमो आहे. यामध्ये व्यवस्थित अंतर्वस्त्रे घाला अशी तंबी देण्यात आली आहे. ‘डेली मेल’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

फ्लाईट अटेंड्स या ग्राहकांबरोबर सर्वाधिक वेळ घालवतात. तसंच, ते आमच्या कंपनीचा चेहरा असतात. त्यामुळे त्यांनी ग्राहकांना योग्य सुविधा पुरवली पाहिजे. त्यामुळे फ्लाईट अटेंडंटच्या गणवेशापासून त्यांच्या मेकअपची काळजी घेतली जाते. एवढंच नव्हे तर त्यांनी शरीरावर कोठ गोंदवावं, गोंदवलेलं असेल तर लपवावं, शरीरावर कुठे टोचावं याचेही नियम असतात. ग्राहकांना आकर्षित करण्याकरता फ्लाईट अटेंडंटसाठी असे नियम तयार केले जातात. अनेक कंपन्यांमध्ये लिपस्टिकचे कोणती शेड असावी इथपासून ते केसांची पोनी कशी बांधावी इथपर्यंत सर्व गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं.

important research for army fighter mig 29 aircraft
लष्कराच्या लढाऊ ‘मिग २९’ विमानासाठी महत्त्वपूर्ण संशोधन… पुण्यातील ‘एनसीएल’कडून नवी प्रणाली विकसित!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
smart wearables loksatta article
कुतूहल: स्मार्ट परिधानीय (स्मार्ट वेअरेबल्स)
Mumbai, Flyover Mankhurd T Junction, Mankhurd T Junction,
मुंबई : मानखुर्द टी जंक्शनवर उड्डाणपूल बांधणार, वाहतूक कोंडी टळणार
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन
bomb in 11 planes
अकरा विमानात बॉम्ब ठेवल्याच्या ट्विटमुळे एकच खळबळ
During Deepotsava FDA urged food sellers to follow rules and warned against adulteration
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

हेही वाचा >> Boarding From Left Side : विमानात नेहमी डाव्या बाजूने का चढतात? प्राचीन काळातील ‘हे’ कारण जाणून घ्या!

डेल्टाच्या मेमोमध्ये नेमक्या काय सूचना आहेत?

  • शेव्हिंग केल्यानंतर कोलोन किंवा हलके परफ्युम लावण्यास परवानगी आहे
  • पापण्या (Eyelashes) नैसर्गिक दिसल्या पाहिजेत.
  • चेहऱ्यावरील केस व्यवस्थित ट्रीम केलेले हवेत. ते व्यवस्थित दिसले पाहिजेत.
  • नखे व्यवस्थित ट्रीम करावीत. नखे पॉलिश असल्यास त्यावर निऑन रंग, मल्टिकलर, चकाकी किंवा नेल आर्ट नसावं.
  • शरीरावर कुठेच टॅटू दिसू नये.
  • केस लांब असल्यास ते मागे बांधले पाहिजेत. शक्यतो त्याचा आंबाडा बांधला जावा. तसंच, केसांना हायलाईट्स व इतर आकर्षक रंग वापरण्यास मनाई आहे. केस नैसर्गिकच दिसले पाहिजेत.
  • अंगावर सोने, चांदी, मोती किंवा हिऱ्यासारखे दागिने घालण्यास परवानगी आहे. तसंच, फक्त एका बाजून नाक टोचण्याची परवानगी आहे. कान टोचले असल्यास प्रती कानात दोन कानातले घालण्याची परवानगी आहे. शरीरावर इतर कोणत्याही ठिकाणी टोचण्याची परवानगी नाही.
  • योग्य अंतवस्त्रे परिधान केली पाहिजेत. ही अंतर्वस्त्रे दिसता कामा नये.
  • पोषाख किंवा स्कर्ट गुडघ्याजवळ किंवा गुडघ्याखाली असावा. बटण-कॉलर असलेले शर्ट घातल्यास ते टायसह जोडलेले असावेत.
  • मुलाखतीच्या दिवशी अपशब्द वापरण्यास मनाई आहे. तसंच च्युइंगम, फोन आणि इअरबड वापरण्याचीही परवानगी नाही.