AAIB Investigation Report on Air India Plane Crash: अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या एआय-१७१ विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. यात २६० लोकांचा मृत्यू झाला. अपघाताला आज (१२ जुलै) एक महिना पूर्ण होत असतानाच भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था – AAIB) अपघाताच्या कारणांची माहिती देणारा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानंतर एअर इंडियाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

एअर इंडियाने शनिवारी मध्यरात्री एक्सवर पोस्ट शेअर करत एएआयबीच्या अहवालावर भाष्य केले आहे. “तपास अजून सुरू असल्यामुळे अहवालातून कोणत्याही माहितीवर आताच काही प्रतिक्रिया व्यक्त करणे उचित ठरणार नाही”, असे एअर इंडियाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

“तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे या टप्प्यावर आम्ही विशिष्ट तपशीलांवर भाष्य करणार नाही. एएआयबीच्या अहवालातील निष्कर्ष तपासून पाहिले जातील”, असे एअर इंडियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोला (AAIB) अपघाताचा तपास करून ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करावा लागतो. त्याप्रमाणे काल रात्री उशीरा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

एअर इंडियाने या अहवालाबाबत म्हटले की, विमान अपघात तपास ब्युरोने १२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालाची प्रत आम्हाला मिळाली आहे. आम्ही तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.

Air India on aaib report
एअर इंडियाची प्रतिक्रिया

अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून एअर इंडिया नियामक आणि सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करत आहे. एएआयबीला चौकशीत आमचे पूर्ण सहकार्य लाभेल, असेही एअर इंडियाने पोस्टमध्ये म्हटले. तसेच विमान अपघातात बळी पडलेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त केली.

“एआय-१७१ अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांच्या पाठिशी एअर इंडिया ठामपणे उभी आहे. मृत पावलेल्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो आणि या कठीण काळात बाधितांना मदत करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहोत”, अशीही भावना सदर पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एएआयबीने अहवालात काय म्हटले?

एएआयबीने आपल्या तपास अहवालात म्हटले की, १२ जून रोजी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानातील इंधन नियंत्रण स्विच बंद झाले होते. काही सेकंदाने ते पुन्हा चालू करण्यात आले. मात्र तोपर्यंत विमानाची उंची खूपच खाली आली होती.