इराणने काही दिवसांपूर्वी इस्रायलवर हवाई हल्ला करून युद्धाल तोंड फोडले होते. त्यानंतर इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर (वय ६८) हे आता अंतरिम अध्यक्षपद भूषविणार आहेत. अंतरिम अध्यक्ष म्हणून मोहम्मद मोखबर हे आता तीन सदस्यीय समितीचा भाग असतील. संसदेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची ही समिती पुढील ५० दिवसांच्या आत नव्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची घोषणा करेल.

रईसी यांच्याप्रमाणेच मोहम्मद मोखबर हेदेखील इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खेमेनी यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. २०२१ साली रईसी जेव्हा अध्यक्ष झाले, तेव्हाच मोखबर हे इराणचे पहिले उपाध्यक्ष झाले होते.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
MP 60 Plus Years Old Dalit couple Tied To Pole Beaten By Villagers
खांबाला बांधलं, बेदम मारलं आणि मग.. ६५ वर्षांचे वडील व ६० वर्षांच्या आईला भोगावी लागली लेकाच्या गुन्ह्याची शिक्षा,घडलं काय?
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Ebrahim Raisi crashed helicopter
Ibrahim Raisi यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचं अमेरिकन कनेक्शन? जाणून घ्या बेल २१२ चॉपर किती सुरक्षित?

Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

ऑक्टोबर २०२३ मध्ये इराणचे एक शिष्टमंडळ रशियाच्या मॉस्कोमध्ये शस्त्रास्त्रांचा करार करण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात मोखबर यांचाही समावेश होता. जमिनीवरून मारा करण्यात येणारी शस्त्रास्त्रे आणि ड्रोन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिल्याचे द इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे.

मोखबर हे याआधी सर्वोच्च नेते खेमेनी यांच्याशी संबंधित असलेल्या Setad या गुंतवणूक निधीचे प्रमुख होते.

२०१३ मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने मंजूर केलेल्या संस्थांच्या यादीमध्ये सेताड आणि इतर ३७ कंपन्यांना समाविष्ट केले.

रविवारी (दि. १९ मे) दुपारी रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. शोध पथकाला अथक परिश्रमानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले. या घटनेत इब्राहीम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?

कोण होते इब्राहीम रईसी?

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये भाग घेतला.