बीजिंग : करोना विषाणूचे मूळ  शोधण्याच्या  जागतिक आरोग्य संघटनेच्या उपक्रमाचा  पुढचा टप्पा सुरू होत आहे, मात्र असा तपास करणे जागतिक आरोग्य संघटनेला शक्य होईल काय, तो कितपत विश्वासार्ह असेल, असा प्रश्न अनेक वैज्ञानिकांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या काही तज्ज्ञांनी म्हटले आहे, की अमेरिका आणि चीन यांच्यात राजकीय तणाव असताना संयुक्त राष्ट्रांची जागतिक आरोग्य संघटना विषाणूचे मूळ विश्वासार्ह पद्धतीने शोधू शकत नाही. करोनाचे मूळ शोधायचे असेल तर १९८६ मध्ये चेर्नोबिल अणु दुर्घटनेच्या नंतर जसे निष्पक्ष पथक नेमून चौकशी करण्यात आली होती, तशा पद्धतीने चौकशी करण्यात यावी. जागतिक आरोग्य संघटना व चीन यांनी मार्चमध्ये करोनाच्या मुळाबाबत पहिला अभ्यास जारी केला होता. त्यात हा विषाणू प्राण्यातून माणसात आला व प्रयोगशाळेतून तो सुटलेला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.  आता जागतिक आरोग्य संघटना पुढच्या टप्प्यातील चौकशी करीत असताना त्यात पहिल्या मानवी रुग्णाबाबत माहिती घेतली जाणार आहे व कोणत्या प्राण्यामधून हा विषाणू माणसात आला यावर भर दिला जाणार आहे. वटवाघळातून हा विषाणू माणसात आला व अजूनही काही प्राणी या विषाणूचे मध्यस्थ असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे व चीनचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे सार्वजनिक आरोग्य कायदा व मानवी हक्क अध्यक्ष लॉरेन्स गोस्टीन यांनी सांगितले, की जागतिक आरोग्य संघटनेच्या  भरवशावर राहून विषाणूचे मूळ शोधणे चुकीचे आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेला चीनने नेहमीच असहकार्य केले असून भूलथापा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who on next phase of investigation into covid 19 origins zws
First published on: 03-07-2021 at 01:28 IST