रातोरात श्रीमंत व्हावे म्हणून अनेकजण वेळोवेळी लॉटरी लावतात. काही जणांना नशीब साथ देते मात्र, अनेकवेळा लॉटरी लागत नाही. पैशांच्या मोहासाठी अनेकवेळा लॉटरी लावली जाते मात्र कवचितच लॉटरी लागते. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर १४ वेळा लॉटरी लागली आहे. त्या व्यक्तीमुळे वैतागून आधिकाऱ्यांना लॉटरीच्या नियमात बदल करावा लागला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा विषय चर्चिला जातोय.
स्टीफन मंडेला असे १४ वेळा लॉटरी लागलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कमाल म्हणजे ते गणिततज्ज्ञ आहेत. स्टीफन यांनी कोणतीही फसवणूक न करता १४ वेळा लॉटरी जिंकली आहे. मूळचे रोमानियाचे आणि आता ऑस्ट्रेलियन नागरिक असलेले मंडेल यांनी आपल्या गणितातील कौशल्याचा वापर करत लॉटरी जिंकण्याचा एक फॉर्मुला शोधला होता. पाच अंकांच्या फॉर्म्युल्यामधून सहावा क्रमांक अचूक शोधण्यास सुरुवात केली होती. या फॉर्मुल्याच्या जोरावर मंडेला यांनी १४ वेळा लॉटरी जिंकली. शेवटी लॉटरी आधिकाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मंडेल यांना रोखण्यासाठी त्यांनी आपले नियम बदलले.
रोमानियामध्ये स्टीफन मंडेला यांना पहिल्यांदा या फॉर्मुल्यामुळे लॉटरी लागली. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. तिथेही त्यांनी मोठ्या जॅकपॉटवर नजर ठेवून लॉटरीचे तिकिट खऱेदी केले. तिथेही त्यांनी १२ लॉटरी जिंकल्या