Apple Advertisement 9 41 time on iPhones : अ‍ॅपल कंपनी जेव्हा त्यांचा नवीन आयफोन, आयपॅड किंवा मॅकबूक लाॉन्च करते तेव्हा त्यामध्ये एक गोष्ट सगळीकडे सारखीच असल्याचं दिसतं, ती म्हणजे त्या गॅझेटच्या डिस्प्लेवरील वेळ. अ‍ॅपलच्या आयफोन, आयपॅड किंवा मॅकबूक डिस्प्लेवर सकाळचे ९.४१ वाजल्याचं (9:41 AM) दाखवलं जातं. इतरं घड्याळ किंवा फोनच्या जाहिरातींमध्ये हे वेळ काहीही असू शकते. परंतु, अ‍ॅपलच्या गॅझेट्समध्ये ९.४१ हीच वेळ असते.

अ‍ॅपल गॅझेट्सच्या जाहिराती पाहून अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे की कंपनीने डिस्प्लेवर दाखवण्यासाठी हीच वेळ का निवडली असावी? अ‍ॅपलच्या गॅझेट्स डिस्प्लेवर दुसरी कुठली वेळ का दाखवली जात नाही? तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे देणार आहोत.

MacWorld Expo 2007 शी थेट संबंध

अ‍ॅपलच्या गॅझेट्सवर ९.४१ ही वेळ दर्शवण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या मॅकवर्ल्ड २००७ या कार्यक्रमाशी संबंधित आहे.

MacWorld Expo 2007 या कार्यक्रमाद्वारे स्टीव्ह जॉब्स यांनी अ‍ॅपलचा पहिला आयफोन जगासमोर सादर केला होता. सकाळी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ९ वाजून ४१ मिनिटांनी त्यांनी पहिला अ‍ॅपल आयफोन स्क्रीनवर सादर केला. त्यावेळी फोनच्या स्क्रीनवर देखील 9:41 AM हीच वेळ होती.

२५ वर्षे जुन्या कार्यक्रमाशी थेट संबंध

अ‍ॅपल कंपनीतील अधिकारी स्कॉट फोरस्टॉल म्हणाले की “कंपनी जेव्हा नवीन उत्पादन सादर करते. त्यावेळी लॉन्चिंग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ४० मिनिटांनी त्यांचं उत्पादन लोकांसमोर सादर केलं जातं. त्यामुळे स्क्रीनवरील गॅझेटच्या स्क्रीनवरील वेळ व लोकांच्या मनगटावरील व फोनवरील वेळ सारखीच दिसते.” सुरुवातीच्या ४० मिनिटांमध्ये कंपनीची आणि उत्पादनाची माहिती, स्टीव्ह जॉब्स यांचं मनोगत आणि इतर अपडेट्स दिले जातात. पहिला आयफोन ९.४१ वाजता सादर केला होता. त्यामुळे कंपनी आता उत्पादन लॉन्च करताना तीच कार्यक्रमाची पद्धत आणि सारख्याच वेळेचं पालन करते.

अ‍ॅपलचं कोणतंही गॅझेट (Phone, iPad, MacBook) लॉन्च झाल्यानंतर वेगवेगळ्या जाहिराती, होर्डिंग्स आणि पोस्टर्सवर ९.४१ हीच वेळ दाखवली जाते. कारण आता ही वेळ अ‍ॅपलची ओळख बनली आहे. ९.४१ एएम ही वेळ अ‍ॅपलसाठी भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली वेळ बनली आहे. ब्रँड याता या वेळेशी जोडला गेला आहे. कंपनीला देखील आपली ही ओळख पसंत पडली आहे. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक जाहिरातीत या वेळेचा वापर केला गेला आहे.